उल्लेखनीय...! आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : दि.१७ जाने. २०२५ ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरुळ येथे वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजयभाऊ देरकर यांच्या वाढदिवसानिमित्य सामजिक कार्यकर्ते अतुल वटे, शितल पोटे माजी सभापती- पं-स-मारेगांव, सरपंच प्रमोद आत्राम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोरेश्वर गेडाम, श्रीराम ठेंगणे अभिराज भोयर, जिवन वैद्य, राजु जेनेकर यांच्या विद्यमाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला कार्यकर्ता मंडळी, व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या संगिता टोंगे, रंजना टोंगे, अमृता घुगुल, निता राजूरकर, पंचफुला वाघमारे, वंदनाताई बल्की, स्वाती कोरझरे, मुख्याध्यापक डी डी ताजने, शिक्षक जी जी राऊत व बंडु लाडसे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


आजच्या या युगात वाढदिवसावर लोक लाखो रुपये खर्च करतात. पण, मंगरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्चाला फाटा देत शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व भेट देऊन साजरा केला आहे.त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रवीण बोथले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


खुशीयांची लाट तुमच्या जीवनात यावी, दुःखं दूर जावीत आणि तुम्ही सदैव हसत राहा. तुमच्या जन्मदिनी ढेर सारी शुभेच्छा! तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो आणि तुमच्या जीवनात अमूल्य प्रेम आणि आनंदाचा अनुभव मिळो. आमचे बिजनेस पार्टनर तथा जिवलग मित्र प्रवीणजी बोथले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छुक :- अविनाश लांबट 
• भाजप तालुका अध्यक्ष मारेगाव 
• कृ. ऊ बा. स संचालक, मारेगाव 
• सरपंच संघटना तालुका अध्यक्ष, मारेगाव 

थोर श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मृतिदिन निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : तेली समाजाचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायातील थोर श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या स्मृती निमित्त वणी मध्ये प्रेरणा यात्रा दिनांक १९/०१/२०२५ रोजी रविवारला आयोजित केले आहे. हि प्रेरणा यात्रा दिनांक १९/०१/२०२५ ला सकाळी ११:०० वाजता वणी शहरातील तेली फैल (बस स्थानक) जवळून निघणार आहे. हि प्रेरणा यात्रा वणी शहरातील प्रमुख मार्गाने निघून वणी येथील संताजी इंग्लिश मिडीयम स्कुल च्या प्रांगणात प्रबोधनात्मक भाषणाने सांगता होणार आहे.

​या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. हंसराजजी अहिर (माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री) अध्यक्ष राष्ट्रीय मागास वर्गीय आयोग यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात चंद्रपूर, वणी, आर्णी या लोकसभा मतदार संघाच्या नव निर्वाचित खासदार श्रीमती. प्रतिभा धानोरकर, मा. श्री. संजय देरकर नव निर्वाचित आमदार वणी विधानसभा, तसेच मा. श्री. बाळासाहेब मांगुळकर नव निर्वाचित आमदार यवतमाळ विधानसभा यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री. संतोष ढवळे जिल्हा अध्यक्ष शिवसेना (उबाठा) अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या प्रेरणा यात्रेचे स्वागताध्यक्ष मा. श्री. नरेंद्र तराळे सेवा निवृत्त नगर परिषद अभियंता हे उपस्थित राहणार आहेत.

​दिनांक १८/०१/२०२५ रोजी शनिवारला दुपारी ०३:३० वजता श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण व भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच संताजी महिला विचार मंच वणीच्या वतीने महिलांचे विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या सर्व कार्यक्रमाला वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील तेली समाज बांधवांनी आपल्या कुटुंबासहित उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आव्हान श्री. संताजी स्मृती पर्व निमंत्रक समिती वणी, श्री. संताजी ज्ञान प्रसारक मंडळ वणी, संताजी महिला विचार मंच वणी, विदर्भ तेलीसमाज महासंघ वणी, हनुमान मंदिर देवस्थान व लाठी आखाडा वणी यांनी केले आहे.

वाघाची नख व दात चोरी करणाऱ्या चौघांना वन विभागाने केली अटक

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : मृत्यूमुखी पडलेल्या वाघाची नख व दात चोरी करणाऱ्या संशयित चौघांना वन विभागाने अटक केली. नागेश विठ्ठल हिरादेव (वय 40, रा.उकणी), रोशन सुभाष देरकर (वय 28, रा. उकणी),आकाश नागेश धानोरकर (वय 27,रा. वणी), व सतीश अशोक मांढरे (वय 26, रा. वणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे चारही आरोपी वेकोली निलजई कोळसा खान मध्ये कामगार असल्याची माहिती आहे. 

वणी तालुक्यातील उकणी येथील खुल्या कोळसा खाणीच्या बोअरवेलजवळील डिपीनजीक मंगळवारी 7 जाने. रोजी तीन ते चार वर्षे वयाचा हा वाघ मृतावस्थेत आढळला. वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. या वाघाचा मृत्यू 10 ते 12 दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता वन अधिकाऱ्यांनी वर्तविली होती. या वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला की, त्याची शिकार करण्यात आली. याबाबत वनविभागाकडून अमरावती, यवतमाळ, पांढरकवडा व वणी येथील पथक तयार करून कसून तपास केला गेला. या वाघाचा मृत्यू विजेचा धक्का लागल्याने झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, वाघाचे नखे व जबड्यातील मुख्य दात गायब करण्यात आल्याने या दृष्टीने तपास सुरू केला असता वाघाचे दात व नख चोरून नेणाऱ्या चार संशयित आरोपीना वन विभागाने अटक करून आज शुक्रवारी कोर्टात हजर केले असता त्यातील दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर दोघांना वन विभागाची कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या दोघांना जामिनावर सोडण्यात आले अशी माहिती आहे. 

वनविभागच्या कोठडीतील आरोपीचा आत्महत्या प्रयत्न 
मृतावस्थेत आढळलेल्या वाघाचे दोन मुख्य दात आणि 12 नखे गायब असल्याने वाघाचा मृत्यू नैसर्गिक आहे की त्याची शिकार करण्यात आली, याचा शोध वनविभागाने सुरू केला. आणि चार आरोपीना ताब्यात घेतलं होत. काल न्यायालयात त्यांना हजर केले होते दोघांना न्यायालयीन कोठडी तर दोघांना वन विभाग कोठडी सुनावली होती त्यातील नागेश विठ्ठल हिरादेव या आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला, ही बाब वनविभागाच्या लक्षात येताच त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढे हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

आमदार संजय देरकर यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वणी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या नांदेपेरा ग्रामपंचायत अंतर्गत घेण्यात आलेल्या शिपाई भरती परिक्षेत झालेला घोळ व अन्यायाचा विरोधात आमरण उपोषण सुरु करण्यात आले. आज शुक्रवार, (ता.17) उपोषणाचा तिसरा दिवस होता, मात्र तीन दिवस लोटूनही प्रशासनाने उपोषण स्थळी भेट दिली नाही. त्यामुळे आमदार संजय देरकर यांनी उपोषण मंडपी भेट देऊन त्या उपोषणकर्त्यांना आश्वासन दिल्यानंतर सदर उपोषण नारळपाणी पिऊन सोडण्यात आले. 

मागील तीन दिवसापासून वणी तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत अंतर्गत शिपाई भरती परिक्षेत झालेला घोळबाबत परीक्षार्थी तालुका जिल्हा वरिष्ठा कडे निवेदन सादर केले होते. त्यामध्ये  दिनांक ३०-१२-२४ रोजी झालेली शिपाई भरती रद्द करुन फेरपरीक्षा घेण्यात यावी, परिक्षेत घोळ करणाऱ्यां संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, शिपाई पद भरती परिक्षेतील सिसिटिव्ही फुटेज देण्यात यावे, लेखी परीक्षा झाल्यानंतर तोंडी परीक्षा घेण्यात यावी व नंतर निवड करण्यात यावी, परिक्षा घेणारे अधिकारी बि.एन.जाधव यांचे दिनांक २७-१२-२४ ते २-१-२५ पर्यंत मोबाईल डाटा व काॅल डिटेल्स चेक करण्यात यावे, या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले होते. आज उपोषणाचा तिसरा दिवस होता. सायंकाळी ५.३० वाजता आमदार संजय देरकर यांनी उपोषण मंडपाला भेट घेऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून परीक्षार्थिना आश्वासन दिल्यानंतर आमरण उपोषण नारळ पाणी पिऊन मागे घेण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमख संजय निखाडे, शरद ठाकरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे, सुरेश शेंडे शिवसेना शाखा प्रमुख नांदेपेरा, सुधीर थेरे शहर प्रमुख वणी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण खानझोडे, राजु तुरणकर माजी नगसेवक, मंगल भोंगळे, रुद्रा कुचनकर, अभिनंदन भेंडाळे, संजोग झाडे, साहील ठमके, तुषार खामनकर, पवन कोडापे आदींची उपस्थिती होती.