सचिन पचारे शिवसेना मारेगांव संपर्क प्रमुख पदी नियुक्त

 

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : युवा तडफदार, आक्रमक भुमिकेसाठी तालुक्यात परिचित असलेले, तसेच सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून प्रश्न सोडवणारे सचिन पचारे यांना शिवसेना मारेगांव संपर्क प्रमुख पदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांची निवड शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. 

विशेष उल्लेखनीय की, पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो, त्याच्या समस्येप्रसंगी हक्काने धावून जाणारा शिवसैनिक म्हणून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. नुकतेच त्यांनी घरकुल लाभार्थ्यांना दर्जेदार वाळू मिळावी यासाठी उपोषण केले होते.त्यांच्या मागणीला यशही मिळाले. अशा अनेकानेक त्यांच्या केलेल्या कामाची पोचपावती फळास आली असावी बोलल्या जातं.

श्री पचारे यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या संपर्कात सुधारणा होईल आणि पक्ष अधिक वाढवता येईल, अशा भावना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या अनुषंगाने त्यांच्या समर्थकातून व्यक्त होत आहे.

नवनिर्वाचित संपर्क प्रमुख सचिन पचारे यांचा सत्कार 
मंगळवार दि. 24 जून रोजी वणी येथील वसंत जिनींग सभागृहात शिवसेनेच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. नवनिर्वाचित संपर्क प्रमुख सचिन पचारे यांचा आमदार संजय देरकर यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यासत्कार सोहळ्यात वणी मारेगाव झरी तालुक्यातील नव्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या सर्व कार्यकर्त्याचे अभिनंदन करण्यात आले.