लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता व मुदतीमुळे चिंतातूर महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे

राळेगाव : "माझी लाडकी बहीण" योजनेला लागणाऱ्या कागदपत्रे पुराव्यांची पुर्तता व योजनेला असलेल्या मुदतीत करु शकत नसल्याने मी लाडकी बहीण योजनेतुन दर महिन्याला मिळणाऱ्या १५०० रुपये लाभापासून वंचित राहणार तर नाही ना? या चिंतेमुळे दिनांक ३-७-२०२४ रोजी खैरी येथील कलावती लक्ष्मण बुरडकर (वय ५८) या महिलेने शेतातुन मजुरी करुन आल्यावर सायंकाळी पाच वाजताचे दरम्यान आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदर घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनला मिळतात खैरी बिट जमदार रमेश आत्राम, अविनाश चिकराम,हे घटनास्थळी पोहचुन सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहे.

"लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी मुदतीची अटच कशाला? अनेक महिला या सासरी आहे, तर अनेक महिला निरनिराळ्या कारणांमुळे बाहेरगावी आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेला लागणाऱ्या कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी मुदत दिल्याने काही महिलांचे कागदोपत्री पुरावे हे लवकरच होणार असे नाही. त्यामुळे महिला चिंतातुर होऊन यापलीकडे पण अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजना ही मारेहचा अहेर की बहिणीच्या गळ्यात असलेला गळफास अशी चर्चा परीसरातील नागरिकांतून ऐकायला मिळत होती."

जेव्हापासून योजना आली तेव्हा पासून माझी आई चिंतेत आणि नाराज राहायची, प्रमाणपत्र सह कागदपत्रे माझे वेळेवर होणार नाही, मलाही लाभ घेता येणार नाही म्हणून तीने हे टोकाचे पाऊल उचलले.
-गोलु लक्ष्मण बुरडकर
मृतक माहिलेचा मुलगा रा. खैरी ता. राळेगाव जि. यवतमाळ
 
लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता व मुदतीमुळे चिंतातूर महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता व मुदतीमुळे चिंतातूर महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on July 04, 2024 Rating: 5
Powered by Blogger.