TDRF द्वारा "एक जवान, एक वृक्ष" उपक्रमाद्वारे विविध ठिकाणी वृक्षारोपण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : १ जुलै रोजी हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती व कृषि दिनानिमित्त वन महोत्सव अंतर्गत टी.डी.आर.एफ. संचालक हरिश्चंद्र ब. राठोड यांच्या मार्गदर्शनात एक जवान एक वृक्ष हा उपक्रम राबवून TDRF उपविभागीय अधिकारी कार्यालय वणी कडून विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आले. TDRF उपविभागीय अधिकारी कार्यालय वनी कडून TDRF मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद यांच्या नेतृत्वात वणी मधील विविध ठिकाणी एकूण २०० वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. 

TDRF द्वारा वृक्ष लागवडीचा प्रण
TDRF संचालक हरिश्चंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनात सर्व TDRF अधिकारी आणि जवानांनी १ जुलै २०२४ ते ५ मार्च २०२५ पर्यंत वृक्षरोपण करून त्यांचे संगोपन करण्याचा प्रण घेतला आहे. या कालावधीत TDRF द्वारा विविध ठिकाणी झाडे लावण्यात येईल व नागरिकांमध्ये पर्यावरण संबंधित जनजागृती करून झाडे लावण्यास इच्छुक नागरिकांना झाडांचे वाटप करून त्यांच्या हस्ते झाडे लाऊन त्यांचे संगोपन करण्यात येईल.

या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी वणी चे वन परिक्षेत्र अधिकारी प्रभाकर सोंडवले यांच्या प्रमुख उपस्थितीत छोरीया लेआउट, साईलीला नगरी, पशु वैद्यकीय रुग्णालय मध्येही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी पशुवैद्यकीय रुग्णालयाचे डॉ. तुषार बावणे उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमात वड नीम, पिंपळ, जामुन, गुलमोहर, वेल, सीताफळ,जाम, सिंदूर, निलगिरी इत्यादी उपयोगी रोपांची लागवड करण्यात आली. 

या उपक्रमासाठी TDRF वणी कंपनीचे कंपनी कमांडर गणेश दत्तू बुरांडे, ईशा विशाल जुनगरी, वृषाली विलास वाटेकर, प्राची गोपाल डोंगे ,दुर्गा विठ्ठल डाखरे, सुमित घनशाम जुमनाके, वैभव गजानन माळावी, साहिल विजय लोघंडे, आकाश बालाजी पोयाम, इत्यादी TDRF अधिकारी व जवान उपस्थित होते.



TDRF द्वारा "एक जवान, एक वृक्ष" उपक्रमाद्वारे विविध ठिकाणी वृक्षारोपण TDRF द्वारा "एक जवान, एक वृक्ष" उपक्रमाद्वारे विविध ठिकाणी वृक्षारोपण Reviewed by सह्याद्री चौफेर on July 04, 2024 Rating: 5
Powered by Blogger.