सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शास्त्रीनगर परिसरात अल्पवयीन मुलासोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलीसांच्या माहितीनुसार, शास्त्रीनगर येथे राहणारे फिर्यादी आपल्या अल्पवयीन मुलासह घरी झोपलेले असताना मुलाने फिर्यादीच्या अंगावरील लुंगी बाजूला करून अयोग्य प्रकारे स्पर्श केला. याबाबत फिर्यादी व त्यांच्या पत्नीने मुलाकडे चौकशी केली असता, घराशेजारी राहणाऱ्या आकाश उर्फ अक्षय अरुण वांढरे (वय ३०) याने यापूर्वी अशा प्रकारचे अश्लील व अनैतिक कृत्य करण्यास प्रवृत्त केल्याचे मुलाने सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच फिर्यादींनी तात्काळ डायल 112 वर संपर्क साधून पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलीस स्टेशन वणी येथे दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक 212/2026 अंतर्गत कलम 65(2) BNS तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 4, 5(L)(M)(N), 6 व 10 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपी आकाश उर्फ अक्षय अरुण वांढरे याला अटक केली. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका चौधरी करीत आहेत.