सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : मारेगाव तालुक्यातील एका अंदाजे 57 वर्षीय इसमाचा मृतदेह वणी-नांदेपेरा राज्यमार्गांवर आढळून आला असून, सदर घटना आज रविवारी (16) जून ला सायंकाळी 6.45 वाजताच्या दरम्यान, उघडकीस आली.
रमेश बळीराम निमसटकर (57) रा. मार्डी असे मृतकाचे नाव आहे. ते आदर्श हायस्कूल घोंसा येथे चपराशी म्हणून कार्यरत असल्याचे माहिती असून मुतक यांच्या पाठीमागे पत्नी, एक मुलगी आहे.
आज रविवारी सायंकाळच्या सुमारास वणी सह मजरा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला, अशातच रमेश यांचा मृतदेह परिसरातील नागरिकांना नांदेपेरा व मजराच्या मधात राज्यमार्गांवरील सागवान बनाच्या समोरील रोडवर निदर्शनास आल्यानंतर वणी पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय वणी येथे पाठविण्यात आला. यावेळी घटनास्थळी एकच गर्दी उसळली होती.
57 वर्षीय इसमाचा मृतदेह वणी-नांदेपेरा राज्यमार्गांवर आढळला
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 16, 2024
Rating: