विजेच्या धक्याने तरुण कामगाराचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. हिवरा (मजरा) गावात वीजेच्या धक्क्याने एका जणाचा मृत्यू झाला आहे. घरगुती वेल्डिंगचे काम करत असताना तरुणाला जोरदार विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मारेगाव तालुक्यातील हिवरा (मजरा) येथे विजेचा धक्का लागल्याने निलेश अशोक जरीले (26) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

दरम्यान, निलेश हा गावातीलच बंडू ठावरी यांच्या घरी घरगुती वेल्डिंग चे करत असताना त्यास करंट लागल्याने त्याला तातडीने वणी येथे दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे. मृतकाच्या पाठीमागे आई,वडील व दोन विवाहित बहिणी असा आप्त परिवार आहे. 


विजेच्या धक्याने तरुण कामगाराचा मृत्यू विजेच्या धक्याने तरुण कामगाराचा मृत्यू Reviewed by सह्याद्री चौफेर on June 17, 2024 Rating: 5
Powered by Blogger.