अभिष्टचिंतन | वाढदिवस
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, अमरावती विभागाचे निवृत्त अधिकारी आणि कर्मठ समाजसेवक श्री. गोपाल आडे यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री. आडे हे केवळ निष्ठावान अधिकारीच नव्हते तर समाजकार्याची जबाबदारीही तितक्याच तळपत्याने पार पाडणारे एक सच्चे समाजसेवक आहेत. त्यांच्या या समाजसेवेचे केंद्रबिंदू राळेगाव हे गाव आहे. त्यांनी राळेगावच्या सर्वांगीण विकासासाठी, विशेषतः शिक्षणाच्या क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे.
श्री. आडे यांच्या समाजकार्यामुळे राळेगावच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात झालेला बदल स्पष्ट दिसून येतो. त्यांच्या निस्वार्थ समर्पणाबद्दल आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना दीर्घायुष्यासह निरोगी आरोग्य आणि सुखमय आयुष्याच्या शुभेच्छा.
अमरावती येथून निवृत्त झाल्यानंतरही श्री. आडे राळेगावच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत आणि भविष्यातही ते तेच करतील अशी सर्वाना खात्री आहे.
संकलन : कुमार अमोल
समाजकार्याचे धनी आणि शिक्षणाचे सुहृद - श्री. गोपाल आडे यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 18, 2024
Rating: