टॉप बातम्या

'त्या' तरुणाची अद्वैद माळीकर म्हणून ओळख पटली


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : तालुक्यातील नायगाव परिसरात रेल्वेखाली आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. सुरुवातीला मृत तरुणाची ओळख पटली नव्हती. मात्र पुढे त्याची ओळख अद्वैद विजय माळीकर (रा. नांदेपेरा रोड, लॉयन्स स्कूलच्या मागे, वणी) अशी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नायगावजवळील रेल्वे रुळांवर एका तरुणाचा रेल्वेत कटून मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ही घटना अपघात आहे की अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसून पोलीस तपास सुरू आहे.

दरम्यान, तरुणाची ओळख अद्वैद विजय माळीकर अशी झाल्याचे समोर आले असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();