सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील बोरी (खुर्द) येथे स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत आवारात करण्यात आलेल्या अंत्यसंस्काराच्या घटनेनंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या घटनेप्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेनंतर परिसरात विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली असून, पोलिसांनी प्राप्त तक्रारीची दखल घेत संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणातील सर्व बाबींची पडताळणी करून कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
दरम्यान, स्मशानभूमीच्या सुविधेअभावी ही परिस्थिती निर्माण झाल्याचा मुद्दा अद्यापही कायम असून, ग्रामस्थांनी गावात कायमस्वरूपी स्मशानभूमी व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहेत.