टॉप बातम्या

भांडेवाडा परिसरातील डिझेल-बॅटरी चोरीचा छडा; दोघे पोलिसांच्या ताब्यात

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : भांडेवाडा परिसरातील जीओ टॉवरमधून डिझेल व बॅटरी चोरी करणाऱ्या दोन संशयितांना वणी पोलिसांनी ताब्यात घेत चोरीचा छडा लावला. पोलिसांनी या कारवाईत चोरीचा डिझेल, बॅटरी तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भांडेवाडा येथील जीओ टॉवरमधील डिझेल व बॅटरी चोरीला गेल्याची दिनांक १६/०९/२०२६ रोजी तक्रार वणी पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राजूर कॉलरी परिसरातील अरशिल अकील शेख (वय २५) आणि अयान शादिक शेख (वय २१) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत दोघांनी भांडेवाडा परिसरातील जीओ टॉवरमधून डिझेल व बॅटरी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

चोरी केलेले डिझेल हायवेवरील वाहनचालकांना विकून ११ हजार ५०० रुपये, तर चोरीची बॅटरी विकून १० हजार रुपये मिळवल्याचे तपासात समोर आले. तसेच चोरी करताना वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक MH 34 J 5791, अंदाजे १० हजार रुपये किमतीची, पोलिसांनी जप्त केली. अशाप्रकारे एकूण ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांच्या नेतृत्वात पोउपनि साजिद सय्यद, पोहेकॉ गजानन सावसाकडे, पोका रितेश भोयर, गणेश मेश्राम, मोनेश्वर खंडरे व नंदकुमार पुप्पलवार यांनी केली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();