टॉप बातम्या

शिक्षकाच्या चक्क दोन बँक खात्यांतून ३.६३ लाखांची परस्पर वळती


सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : कोणताही आर्थिक व्यवहार न करता सेवानिवृत्त शिक्षकाच्या दोन बँक खात्यांमधून तब्बल ३ लाख ६३ हजार रुपयांची रक्कम वळती झाल्याचा धक्कादायक प्रकार वणीत समोर आला आहे. मोबाईलवर बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचे संदेश आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

वणी येथील दिलीप रतनलाल कोचेटा (६७) हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांचे महाराष्ट्र बँक, वणी शाखेत दोन बँक खाते असल्याचे तक्रारीत नमूद आहे. २९ जुलै रोजी रात्री सुमारे ९ वाजता ते घरी असताना त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून रक्कम वळती झाल्याचे संदेश प्राप्त झाले.

पहिल्या खात्यातून  १ लाख ९५ हजार रुपये, तर दुसऱ्या खात्यातून १ लाख ६८ हजार रुपये, अशा एकूण ३ लाख ६३ हजार रुपयांची रक्कम त्यांच्या परवानगीशिवाय वळती झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या घटनेनंतर कोचेता यांनी तातडीने सायबर पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार नोंदवली. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहून त्यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, बँक खात्यातील व्यवहार न करताही रक्कम परस्पर वळती झाल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोबाईलवर अनोळखी लिंक, ओटीपी, संशयास्पद कॉल किंवा बँक व्यवहाराचे संदेश आल्यास नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();