टॉप बातम्या

शेतकऱ्यांनी DCS MH ॲपवर पीक नोंदणी करावी-तहसीलदार उत्तम निलावाड यांचे आवाहन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंदणी अधिक सुलभतेने करता यावी, यासाठी शासनाने DCS MH मोबाईल ॲपद्वारे शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ११ सप्टेंबर २०२६ पासून ही सुविधा सुरू करण्यात आली असून, मारेगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेत आपल्या शेतातील पिकांची अचूक व वेळेत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार उत्तम निलावाड यांनी केले आहे.

शेतकरी आता आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून DCS MH ॲपमध्ये Farmer ID (शेतकरी ओळख क्रमांक) प्रविष्ट करून पिकांची नोंदणी करू शकतात. Farmer ID शी संलग्न असलेल्या सर्व शेतजमिनींची पीक नोंदणी या सुविधेद्वारे करता येणार आहे. त्यामुळे पीक पाहणीची प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात प्रत्यक्ष लागवड केलेल्या पिकांची अचूक माहिती नोंदविणे आवश्यक आहे. पीक नोंदणीची माहिती विविध शासकीय योजना, अनुदान तसेच इतर शासकीय सेवांचा लाभ देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे पीक नोंदणी करताना शेतकऱ्यांनी योग्य माहिती भरून नोंदणी पूर्ण करावी.

मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक नोंदणीसाठी विलंब न करता DCS MH मोबाईल ॲपचा वापर करून शक्य तितक्या लवकर, शक्य असल्यास आजच आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार उत्तम निलावाड, तहसील कार्यालय मारेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

DCS MH ॲप डाउनलोड करण्यासाठी :
Google Play Store – DCS MH मोबाईल ॲप👇
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();