सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
राळेगाव : विदर्भ साहित्य आदिवासी परधान समाज प्रबोधन मेळावा आयोजन समितीच्या वतीने राळेगाव येथे विदर्भस्तरीय आदिवासी परधान समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. समाजातील विविध प्रश्न, सामाजिक एकोपा, शैक्षणिक प्रगती आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय आदिवासी परिषदेचे अध्यक्ष अॅड. मा. लटारी कवडू मडावी होते. प्रमुख प्रवक्ते म्हणून कमांडर मा. गित घोष, तर मुख्य मार्गदर्शक म्हणून अॅड. मा. राजेंद्र मरस्कोल्हे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राळेगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मा. रविंद्र शेराम, उपनगराध्यक्ष मा. जानराव गिरी, नगरसेवक मा. मंगेश राऊत, नगरसेवक मा. बाळू उर्फ शशिकांत धुमाळ, नगरसेविका मा. कमरुनीसा हमीद पठाण, डॉ. प्रेमाताई राजपूत (अमरावती), प्रा. मिनाक्षी बेलसरे (अमरावती) यांची उपस्थिती होती. स्वागताध्यक्ष विलास कन्हाके यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
मेळाव्यात आदिवासी परधान समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसह समाजासमोरील विविध प्रश्नांवर प्रबोधन करण्यात आले. समाजाच्या विकासासाठी संघटन, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांची आवश्यकता असल्याचे यावेळी मान्यवरांनी अधोरेखित केले.
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांचा गौरव
समाजासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांना यावेळी शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन ‘समाज गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
यामध्ये बंडोपंत सोयाय (पुणे), अॅड. अशोक तुमराम (चंद्रपूर), भैयाजी उईके (गडचिरोली), वामनराव शेडमाके (भंडारा), मनोहर उईके (गोंदिया), अॅड. लटारी मडावी (नागपूर), महेंद्र शिंदे (वर्धा), देविदास आत्राम (अमरावती), नागेश किन्हाके (वाशीम), दिलीप कन्हाके (यवतमाळ) आणि शैलेश गाडेकर (यवतमाळ) यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता धुर्वे यांनी केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष मधुसुधन कोवे यांच्यासह देवेंद्र चांदेकर, मनोहर मेश्राम, संजय तिराणकर, होमदेव किन्हाके, कमलदास तिराणिक, मनोज पेंदोर, विनायक आडे, जनार्दन उईके आणि बंडूजी पंधरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
विदर्भातील विविध भागांतून आलेल्या आदिवासी परधान समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा प्रबोधन मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


