टॉप बातम्या

विशाल किन्हेकर यांच्या वाढदिवसनिमित्ताने ५९३ रुग्णांनी घेतला लाभ! ​

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

​मारेगाव : शिवसेनेचे तालुकाप्रमुख विशाल किन्हेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने मारेगाव नगरपंचायत कार्यालयासमोर भव्य मोफत सर्वरोग निदान शस्त्रक्रिया व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

​या आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधर मोहोड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हरिहर लिंगनवार यांनी भूषवले होते. वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

​विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
​या शिबिरात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आलेल्या रुग्णांची विविध आजारांनुसार कसून तपासणी करण्यात आली. यात प्रामुख्याने खालील विभागांतील तज्ज्ञ वैद्याकीय अधिकारी व डॉक्टरांनी सेवा दिली:
​
​तज्ज्ञ डाॅक्टरांनी रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत मार्गदर्शन व योग्य त्या उपचाराविषयी सल्ला दिला.

५९३ रुग्णांनी घेतला आरोग्याचा लाभ
​वाढदिवसाच्या उपक्रमाचे सोने करत आयोजित केलेल्या या शिबिरात परिसरातील एकूण ५९३ रुग्णांनी मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेतला. या संपूर्ण शिबिराचे नियोजन व यशस्वितेसाठी आयोजन समिती तसेच स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेऊन मोलाचे सहकार्य केले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();