टॉप बातम्या

भाजी मंडीत मटका जुगारावर पोलिसांचा छापा; ३१ हजारांची रोकड जप्त

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरातील भाजी मंडी परिसरात सुरू असलेल्या मटका जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत सैय्यद जाफर उर्फ बबलू सैय्यद नन्नू आणि शेख फारुख शेख फरीद यांच्याकडून मटका जुगाराचे साहित्य व ३१ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.

मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकात सहायक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, किशोर आडे आणि सलीम शेख यांचा सहभाग होता.

या कारवाईमुळे शहरातील अवैध मटका जुगाराविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारल्याचे स्पष्ट झाले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();