सह्याद्री चौफेर | किरण घाटे
गडचिरोली : आपल्या रास्त मागण्यांसाठी एका पीडित शिक्षकाला काल पासून गडचिरोली जिल्हा परिषदे समोर उपोषणाला बसावे लागले.
वारंवार पत्रव्यवहार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊनही मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे त्यांना आता उपोषणाला बसण्याचा मार्ग निवडला लागला असल्याचे बोलल्या जाते. त्या गुरुजीचे नाव दिलीप नैताम असून ते गडचिरोली जिल्ह्याच्या एका ग्रामीण भागातील मुळ रहिवाशी आहे.
अनेकदा त्यांनी जिल्हा परिषद व संबंधित पोलिस स्टेशनच्या पाय-या झिजविल्या पण त्यांना योग्य न्याय मिळाला नाही.त्यामुळे त्यांच्या मनात आता जिल्हा परिषद व पोलीस प्रशासना विरुद्ध संताप निर्माण झाल्याचे एकंदरीत दिसून येते.
आपल्या रास्त मागण्यांच्या संदर्भात त्यांनी इंटक कामगार संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांची त्यांनी भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले,त्या अनुषंगाने समर्थ यांनी एकदा नव्हे तर अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधले परंतु त्यांच्या अथक प्रयत्नांना यश प्राप्त झाले नाही.
समर्थ यांचा अद्यापही या प्रकरणात वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे.सदरहू उपोषणातून गुरुजींना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दत्तात्रय समर्थ यांनी दिला आहे.दरम्यान गुरुजी उपोषणाला बसल्यानंतरही प्रशासन अद्याप जागे झाले नाही.
या उपोषणाला समर्थ यांनी आपला जाहिर पाठिंबा दिला असून त्यांनी काल आपल्या काही पदाधिकाऱ्यांसह गुरुजींच्या उपोषणाला मंडपाला भेट दिली.गुरुजींना मानसिक त्रास देणाऱ्या दोषींवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी दत्तात्रय समर्थ यांनी केली आहे.