टॉप बातम्या

कापूस-तुरीसोबत गांजाचं आंतरिक पीक; ऐकाला घेतलं ताब्यात

संग्रहीत छायाचित्र 

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : खरीप हंगामातील कापूस आणि तुरीच्या पिकांचा आडोसा घेत गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचा प्रकार कायर शिवारात उघडकीस आला आहे. शिरपूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संबंधित शेतात छापा टाकून गांजाची १२७ झाडे जप्त केली. या कारवाईत १८ किलो ५८० ग्रॅम वजनाचा, अंदाजे १ लाख ८५ हजार ८०० रुपये किमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला असून, सुखदेव लेतु आत्राम (वय ५०, रा. सैदाबाद) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांविरोधात शोधमोहीम सुरू असताना, सुखदेव आत्राम हा कायर शिवारातील स्वतःच्या शेतात कापूस आणि तुरीच्या पिकांमध्ये गांजाची लागवड करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गांजाची काही झाडे उपटून विक्रीसाठी शेतात ठेवण्यात आली असून, उर्वरित झाडे काढण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचांसह शेतात धाड टाकली. तपासणीदरम्यान गांजाची १२७ झाडे आढळून आली. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक धीरज उल्हाणे, पोलीस हवालदार इकबाल शेख, सूरज साबळे, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर दराडे, दीपक वाकडे, अनुप फुलुके, विजय फुलुके, प्रफुल नाईक आणि होमगार्ड पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. खरीप पिकांच्या आडून गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();