सह्याद्री चौफेर | किरण घाटे
चंद्रपूर : महाराष्ट्रातील नामवंत ‘सहज सुचलं’ महिला व्हॉट्सॲप ग्रुपच्या चंद्रपूर येथील सदस्या उज्वला निमगडे यांनी आज शुक्रवारी विवाहनोंदणी पद्धतीने सुभाष जैस्वाल यांच्याशी विवाहबंधनात प्रवेश केला. या नवदाम्पत्याच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीने त्यांच्या कुटुंबीयांसह आप्तस्वकीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या विवाहानिमित्त दुपारी २ वाजता चंद्रपूर येथील तुकूम मार्गावरील मेजर गेट परिसरात असलेल्या उज्वला निमगडे यांच्या निवासस्थानी विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावत नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, ‘सहज सुचलं’ महिला व्हॉट्सॲप ग्रुपच्या वतीने मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे आणि अधिवक्ता मेघा धोटे यांनी उज्वला निमगडे व सुभाष जैस्वाल यांचे अभिनंदन करून त्यांना सुखी, समृद्ध आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या शुभप्रसंगी नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

