वाढदिवसानिमित्त विशेष
आदिवासी गोंडगोवारी समाजाचे प्रेरणास्थान आणि भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान नेते आदरणीय माधवजी कोहळे यांनी आपल्या समाजाच्या उत्थानासाठी आणि हक्कांच्या रक्षणासाठी अथक परिश्रम केले आहेत. गोंड गोवारी समाजाच्या प्रश्नांना राष्ट्रीय स्तरावर वाचा फोडतानाच, त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना एकत्रित ठेवत संघटनात्मक विस्तारासाठी केलेले त्यांचे योगदान हे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे.
सामाजिक बांधिलकी, निःस्वार्थ जनसेवा आणि पक्षनिष्ठा यांचा अनोखा संगम साधत माधवजी कोहळे यांनी गोंड गोवारी समाजासह सर्वसामान्य जनतेशी एक घट्ट आणि विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेत समाजात त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण झाली आहे. वाढदिवसाच्या या पावन प्रसंगी त्यांच्या उत्तम आरोग्याची, दीर्घायुष्याची आणि आगामी काळात अधिक यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
शुभेच्छुक : माधव कोहळे सर मित्र परिवार, मारेगाव