टॉप बातम्या

पावसाची दमदार हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : वणी उपविभागीय क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होते. कपाशी, सोयाबीन, तूर यासह विविध खरीप पिकांना पावसाची नितांत गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने उभी पिके करपण्याची भीती निर्माण झाली होती. पिकांच्या वाढीवरही त्याचा परिणाम जाणवत असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या.

अशाच चिंतेच्या वातावरणात शेतकऱ्यांनी पोळा सण साजरा केला. दरम्यान, तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर अखेर वरुणराजाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांना सुखद दिलासा दिला. वणी उपविभागातील काही भागांत जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्याने शेतशिवारात पुन्हा चैतन्य निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. पिकांना सध्या पाण्याची मोठी गरज असल्याने झालेल्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन आणि तूर पिकांना नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पावसाने अशीच साथ कायम ठेवावी आणि खरीप हंगामातील उर्वरित पिकेही जोमाने बहरावीत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();