टॉप बातम्या

मंदार गाव हादरले; कौटुंबिक वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, संशयित पोलिसांच्या ताब्यात

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : वडिलोपार्जित जमिनीच्या हक्कावरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाचा शेवट एका भावाच्या मृत्यूने झाल्याची धक्कादायक घटना मंदर येथे घडली. सोमवारी रात्री झालेल्या वादात संतोष बुरडकर यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बुरडकर आणि त्यांचे भाऊ रविंद्र बुरडकर यांच्यामध्ये वडिलोपार्जित जमिनीच्या कारणावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला. त्यातून दोघांमध्ये झटापट झाली आणि संतोष यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

हल्ल्यानंतर संतोष यांना तातडीने वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाली करून रविंद्र बुरडकर याला ताब्यात घेतले. यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात आवश्यक ती वाढ करून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती आहे.

या घटनेमुळे मंदर परिसरात खळबळ उडाली असून, जमिनीच्या वादातून थेट भावाचा जीव गेल्याने कौटुंबिक वाद किती गंभीर वळण घेऊ शकतो, हे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे. घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी आणि हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();