टॉप बातम्या

इंस्टाग्रामच्या ओळखीतून ब्लॅकमेलिंगचा आरोप; अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवर तरुण अटकेत

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : इंस्टाग्रामच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून अश्लील फोटो व व्हिडिओ मागविल्याचा तसेच ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी रक्षण पोनलावार (वय १९, रा. छोरीया लेआउट, वणी) याला अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीची अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. मुलीच्या एका  संबंधाची माहिती तिच्या आई-वडिलांना देण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर दबाव आणल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर तिच्याकडून अश्लील फोटो व व्हिडिओ मागवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, २१ मे २०२६ रोजी रात्री आरोपीने पीडितेला घराबाहेर बोलावून वाहनात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती आरोपीला होती, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी २३ सप्टेंबर २०२६ रोजी वणी पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक ९६९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ३५१(२), ३५१(३), ६४ तसेच पॉक्सो कायद्यातील कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास API प्रियांका चौधरी करीत आहेत. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी तिला ग्रामीण रुग्णालय, वणी येथे पाठविण्यात आले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();