टॉप बातम्या

आदिवासी टायगर सेना यवतमाळची बैठक संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

घाटंजी : आदिवासी टायगर सेना यवतमाळ जिल्ह्याची कार्यकर्ता बैठक आज (दि. १५) रविवारी दुपारी १ वाजता घाटंजी (शासकीय विश्राम गृह) येथे उत्साहात पार पडली. या बैठकीस संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष रमेशजी धुर्वे, जिल्हाध्यक्ष बंडू भाऊ तोडसाम, जिल्हा महासचिव अमोल कुमरे तसेच महिला जिल्हाध्यक्ष वैशाली केराम यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत संघटनेच्या विस्तारासंदर्भात चर्चा करून विविध पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी जिल्हा युवा अध्यक्षपदी अंबादास मेश्राम यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा युवा उपाध्यक्ष (घाटंजी) पदी विजय कनाके यांची नियुक्ती करण्यात आली. वणी तालुका अध्यक्षपदी लहानू सालुरकर तर तालुका सचिवपदी महेश आत्राम यांची निवड करण्यात आली. मारेगाव तालुका अध्यक्षपदी विवेक तोडसे, आर्णी तालुका अध्यक्षपदी श्रीराम मेश्राम, घाटंजी तालुका अध्यक्षपदी कमलाकर नेहारे, तालुका सचिवपदी किशोर कोवे तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निलेश करमरकर यांची नियुक्ती करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे ध्येय व धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तन-मनाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कनाके यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश आत्राम यांनी मानले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();