टॉप बातम्या

ओबीसी मोर्चा यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी मारोती गौरकार


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगावसामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन राजकारणात प्रवेश करून लोकसेवेची वाट निवडणारे आणि गेली तीन दशकं जनतेशी आपुलकीची नाळ जोडून ठेवणारे तसेच काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले मारोती गौरकार यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपविली असून त्यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा विदर्भ संयोजक दिनेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत त्यांना जिल्हा कार्यालयात नियुक्ती पत्र देण्यात आले. नियुक्तीमुळे मारेगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पक्षाने जारी केलेल्या नियुक्तीपत्रात गौरकार यांनी राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांत केलेल्या कार्याची दखल घेत ही जबाबदारी देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. पक्षाप्रती असलेली निष्ठा, समर्पण आणि संघटनात्मक कार्याला अधिक बळ देण्याच्या अपेक्षेतून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

मारोती गौरकार यांनी या विश्वासाबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या नियुक्तीचे श्रेय भारतीय जनता पार्टी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुलजी चव्हाण, माजी आमदार, वणी विधानसभा संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष पवन एकरे, तालुकाध्यक्ष अविनाश लांबट यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाला दिले जात आहे. या प्रसंगी भाजपचे संतोष डंबारे जिल्हा सचिव, अंकुश बोढे, जिल्हा उपाध्यक्ष, प्रशांत नांदे तालुका महामंत्री, भाजप नगरसेवक वैभव पवार आदींची उपस्थिती होती.

मारोती गौरकार यांच्या नियुक्तीबद्दल विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();