सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य अनंता जुमडे यांच्या वाढदिवसानिमित्त मार्डी येथील हनुमान मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.
वाढदिवसाचा आनंद सामाजिक उपक्रमातून साजरा करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश यावेळी देण्यात आला.
या उपक्रमास सरपंच रविराज चंदनखेडे, सुरेश चांगले, संदीप झोटीग, मारुती गुडघे, सुरेश दानव, सुरेश मुरसकर, अमोल टेकाम, गुणवंत मोहुर्ले, सुजय चांगले, गौरव मांढरे, शेख हबीफ, रोशन शिंदे, भोंगळे सर, शेख इस्माईल, पांडुरंग तुरगे आदी उपस्थित होते.
