टॉप बातम्या

नायगाव परिसरात रेल्वेखाली तरुणाचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : तालुक्यातील नायगाव परिसरात रेल्वेखाली आल्याने एका अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ही घटना स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, नायगावजवळील रेल्वे रुळांवर एका तरुणाचा रेल्वेत कटून मृत्यू झाल्याचे आढळून आले. मृतकाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचे वय अंदाजे तरुणवयातील असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना अपघात आहे की घातपात याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

दरम्यान, मृत तरुणाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून, कोणाला या तरुणाबाबत माहिती असल्यास किंवा ओळख पटत असल्यास तात्काळ वणी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();