सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख श्री. आशिषभाऊ खुलसगे यांचे वडील श्री. आनंदरावजी खुलसगे यांचे सोमवार, दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता नागपूर येथील गेटवेल हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे खुलसगे कुटुंबीयांवर तसेच मित्रपरिवार व शिवसेना कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली आहे.
स्वर्गीय आनंदरावजी खुलसगे यांच्या पार्थिवावर मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता सोनेगाव, नागपूर (विमानतळाजवळ) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांकडून शोक व्यक्त करण्यात येत असून, खुलसगे कुटुंबीयांच्या दुःखात अनेकांनी सहभाग नोंदविला आहे.