टॉप बातम्या

पाटण आई देवस्थान, माथार्जुन येथे कोलाम समाजाची महत्त्वपूर्ण बैठक

सह्याद्री चौफर | ऑनलाईन

झरी-जामणी : कोलाम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘शामादादा कोलाम स्वतंत्र अभ्यास आयोग’ स्थापन करण्याच्या मागणीसाठी माथार्जुन येथील पाटण आई देवस्थान येथे शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ रोजी कोलाम समाजाची तातडीची व महत्त्वपूर्ण बैठक दुपारी १२ वाजता पार पडली.

या बैठकीत कोलाम समाजातील नायक, महाजन, घट्या, कारभारी यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य तसेच समाजातील विविध गावांतील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजासमोरील विविध समस्या, विकासासाठी आवश्यक उपाययोजना तसेच कोलाम जमातीच्या सर्वांगीण उन्नतीसाठी स्वतंत्र अभ्यास आयोग स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीसाठी परिसरातील अनेक गावांमधील समाजबांधवांनी उपस्थिती लावत एकजुटीचा संदेश दिला. समाजाच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी पुढील काळात एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

या बैठकीचे आयोजन गंगाधर अय्या आत्राम (सरपंच, गट ग्रामपंचायत मांडवा), जानराव दांडजे, रूपेश टेकाम, किशोर मेश्राम, सतीश टेकाम (उपसरपंच, रायपूर), सामाजिक कार्यकर्ते योगेश मडावी, अशोक आत्राम व कृष्णा टेकाम यांच्या पुढाकारातून करण्यात आले. 

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();