टॉप बातम्या

जि.प. व पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची कार्यशाळा; कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, पक्षप्रवेशही

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा जिल्हाभर आयोजित करण्यात येत आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष मा. प्रफुलजी चौव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आज मारेगाव येथे तर त्यानंतर दुपारी मार्डी येथे कार्यशाळा पार पडली.
वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष माजी आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या नेतृत्वात व तालुका अध्यक्ष श्री अविनाश लांबट पक्षाचे ज्येष्ठ नेते मंगेश देशपांडे यांच्या उपस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रफुल चौव्हाण यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटन बळकट करण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमच्या सुरुवातीला मार्डीत प्रथमच आगमन होत असल्यामुळे जिल्हाध्यक्ष चौव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याच वेळी मच्छिन्द्रा येथील विनोद पारोधी, फेपरवाडा येथील राजू गमे, मच्छिन्द्रा येथील गणेश सिडाम तसेच फेपरवाडा येथील शुभम देऊळकर यांनी अध्यक्ष अविनाशभाऊ लांबट व ता. सचिव अमोल कुमरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला.
या कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष अनिल राजूरकर, तालुका उपाध्यक्ष शेखर काळे, तालुका सरचिटणीस प्रसाद ढवस, प्रशांत नांदे, सुभाष खडसे, तालुका किसान मोर्चाचे अध्यक्ष पवन ढवस, तालुका सचिव विजय खिरटकर, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष सुनील देऊळकर, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष दीपिका रस्से, सरपंच अभिजित मांडेकर, सरपंच रामचंद्र जवादे, सुधाकर महाजन, प्रमोद मसाळकर, उमेश क्षीरसागर, अविनाश किनाके, गौरव उईके, भाऊराव शेळके, दिनेश आवारी, विशाल गाडगे, संजय देवतळे, गणेश खुसपुरे,प्रसिद्धी प्रमुख अतुल खिरटकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();