टॉप बातम्या

मारेगावात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; किन्हेकर यांच्या पुढाकाराने मुस्लिम महिलांसाठी इफ्तार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : जिल्ह्यातील मारेगाव शहर हे नेहमीच हिंदू-मुस्लिम एकता आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. याच सामाजिक ऐक्याची परंपरा पुढे नेत शिवसेनेच्या वतीने मुस्लिम महिलांसाठी भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. चेतना विशाल किन्हेकर यांच्या पुढाकारातून मारेगाव येथील प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

रमजान महिन्यातील १८ व्या रोज्याच्या निमित्ताने मुस्लिम समाजाला शुभेच्छा देत या इफ्तार कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुस्लिम महिलांनी सहभाग नोंदविला. यावेळी मुस्लिम महिलांनी नात-ए-शरीफचे पठणही केले. समाजात शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश कायम राहावा यासाठी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी विशेष दुआ (प्रार्थना) करण्यात आली.

मारेगाव शहरात सामाजिक सलोखा आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. यावेळी ॲड. हुमेरा अली, नगरसेविका अंजुम शेख नबी, खैरून शेख, रकिया शेख दिलदार, डॉ. केलोडे, आलिमा मुस्कान शरीफ, फरसेजहा शरीफ, उजमा शरीफ तसेच नगरसेविका तारा खालिद पटेल यांच्यासह मुस्लिम समाजातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();