टॉप बातम्या

क्रांतिसूर्य वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांची १९३ वी जयंती उत्साहात साजरी


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : दिनांक १२ मार्च रोजी क्रांतिसूर्य वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

हा कार्यक्रम प्रमुख पाहुण्या नगराध्यक्ष विद्याताई खेमराज आत्राम यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाचे ठिकाण नांदोपेरा चौफुली, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके चौक, वणी बायपास येथे होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या शौर्य, बलिदान आणि स्वातंत्र्य संग्रामातील महान कार्याची आठवण करून दिली. त्यांच्या प्रेरणादायी जीवनातून समाजाला देशभक्ती, स्वाभिमान आणि एकतेची प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमास परिसरातील नागरिक, समाजबांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांना विनम्र अभिवादन केले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();