टॉप बातम्या

मार्डी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : नागरिकांच्या महसुल विषयक समस्या तत्काळ सोडवून शासकीय सेवा थेट नागरिकांच्या दारी पोहोचविण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत मार्डी येथे महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार उत्तम निलावाड होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भिमराव व्हनखंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी हेमराज राठोड, तालुका कृषी अधिकारी दिपाली खेवले, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय मडावी, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक जाधव, नायब तहसीलदार विजय मत्ते, मंडळ अधिकारी आर. एस. वरठे, माजी जिल्हा परिषद सदस्या अरुणाताई खंडाळकर, उपसरपंच शोभा कालर, भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे, तसेच पत्रकार भास्कर धानफुले, माणिक काबळे, अमोल कुमरे, सुरेश नाखले, प्रतिभा तातेड, पोलीस पाटील डॉ. प्रशांत पाटील, मंगेश देशपांडे, वसंत आसुटकर, सुरेश चांगले आदी मान्यवर उपस्थित होते.
महसूल विभागाच्या सेवा अधिक गतिमान करून नागरिकांच्या दैनंदिन महसुल विषयक तक्रारींचे एकाच ठिकाणी तात्काळ निवारण करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ उताऱ्यातील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीयुक्त ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वितरण, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिनल प्रमाणपत्र, अकृषक (एन.ए.) तरतुदींविषयी मार्गदर्शन, तसेच नव्या व्यवस्थेनुसार सनद प्रक्रियेची माहिती नागरिकांना देण्यात आली.
मार्डी येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता शिबिरास सुरुवात झाली. या शिबिरात एकूण २१०४ लाभार्थ्यांनी विविध योजनांचा लाभ घेतला. त्यामध्ये महसूल विभागाचे ३९३, कृषी विभागाचे १२०, आरोग्य विभागाचे १२७५, पंचायत विभागाचे ३१६ लाभार्थी समाविष्ट होते.
यावेळी दिव्यांग, निराधार व्यक्ती तसेच घरकुल लाभार्थ्यांना रेतीचे पास वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. डी. कंडाळकर यांनी केले.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();