सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
चंद्रपूर : घुग्घुस येथील महावितरण कंपनीचे कर्मचारी सुरज परचाके ह्यांना कर्तव्यावर असताना नकोडा येथील सरपंच ह्यांनी सुरज परचाके ह्याला भर चौकात खांबाला बांधून मारहाण केल्याची बातमी माहिती होताच आदिवासी टायगर सेनेचे पदाधिकारी थेट पोलिस स्टेशन गाठून झालेल्या प्रकरणाची चौकशी व गुन्हे दाखल करायला उशीर का लावले गेले ह्याची धारेवर धरून माहिती घेतली.
सदर प्रकरणात आदिवासी टायगर सेना ही महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी उभी राहील असे, मत अॅड. संतोष कुळमेथे विदर्भ अध्यक्ष, अॅड. जितेश कुळमेथे विदर्भ महासचिव, प्रा. हितेश मडावी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, ड्रेफुल आत्राम जिल्हा उपाध्यक्ष, दिनेश परतेती तालुका अध्यक्ष चंद्रपूर, रंजीत मडावी जिल्हा युवा अध्यक्ष, विराज सुरपाम जिल्हा युवा महासचिव, शेखर मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष युवा, बाळु कुळमेथे जिल्हा सदस्य सह शेकडो कार्यकर्ते पोलीस स्टेशन व पिढीत कर्मचाऱ्याला भेटून देण्यात आली.
महावितरण कंपनीच्या कामगाराच्या पाठीशी आदिवासी टायगर सेना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 18, 2024
Rating: