सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : दोन दुचाकीची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर, चार जण जखमी झाल्याची घटना दि.18 जून रोजी रात्री 8 वाजता च्या दरम्यान, दापोरा च्या समोर सुदाम देव कोसारा फाट्यावर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दापोरा खैरी वडकी मार्गांवर असलेल्या सुदाम देव फाट्या कोसारा कडे जाणारा मार्गजवळ शंकर गमे रा. विचोड बोरी (अंदाजे वय 37) हा व त्याचा सहकारी कुणाल खिरटकर हे दुचाकीने वणी वरून लग्न कार्य करून गावाकडे येत असतांना खैरी कडून तीन जण येणाऱ्या दुचाकीने या दोघा दुचाकीस्वारात सुदाम देव, कोसारा कडे जाणाऱ्या टर्निंग वर समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात शंकर गमे रा. विचोडबोरी हा जागीच ठार झाला तर, चार जण जखमी झाले. जखमिंचे नाव कळू शकले नाहीत. मात्र,जखमीमध्ये एक छत्तीसगडी कामगार असून जखमी इसमाना मार्डी येथील रुग्णालयात प्राथामिक उपचारास दाखल करून नंतर मारेगाव येथे रवाना करण्यात आले,असे चिंचमंडळ येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल पचारे व अनिकेत झाडे यांनी सांगितले.
घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन वृत्त लिहेपर्यंत सदर घटनेचा पंचनामा सुरू होता. या घटनेने विचोडबोरी येथे शोककळा येथे पसरली. दोन दुचाकीस्वार आमने-सामने भिडल्याने या भीषण अपघातात एक ठार तर चार जखमी झाले असून घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करित आहे.
मोटारसायकलची आमने-सामने धडक : एक ठार तर, चार जण जखमी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 18, 2024
Rating: