सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : लोकसभा सभागृहात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद मारेगावात उमटले आहे. हिंदू धर्मावर आघात करत देवीदेवतांना अपमानित केल्याचा आरोप करताना संताप व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी शब्द वापस घ्यावे आणि समस्त हिंदु धर्माच्या लोकांची माफी मागावी यासाठी आज ०४/०७/२०२४ ला दु. १२.०० वाजता मार्डी चौक येथे भारतीय जनता पक्ष च्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये वाद-प्रतिसाद सुरू होते. यामध्ये धार्मिक टीकाटिप्पणीमुळे सामाजिक वातावरणही पेटले होते. निवडणुकींचे निकाल जाहीर झाले असले तरी अद्यापपर्यंत टीकाटिप्पणी सुरूच आहेत. अशात लोकसभा सभागृहात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नमूद केलेल्या वक्तव्याचा मारेगाव तालुका भाजपातून निषेध नोंदविला आहे. राजकारणासाठी हिंदू धर्माचा वापर करू नये, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
"संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंच्या संदर्भात बेताल वक्तव्ये केली. त्याचा तीव्र निषेध करत मारेगाव तहसील कार्यालय, मारेगाव पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहेत.
यावेळी तारेंद्र बोर्डे जिल्हाध्यक्ष, अविनाश लांबट तालुका अध्यक्ष, शंकर लालसरे, प्रशांत नांदे, अनुप महाकुलकर, मारोती तुराणकर, पवन ढवस, शशिकांत आंबटकर, विनीत जयस्वाल, यासह शेकडो भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राहुल गांधींच्या वक्तव्याचे मारेगावात पडसाद!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 04, 2024
Rating: