सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : आज दि.4 जुलै रोजी मार्डी येथे सकाळी 10 वाजता स्थानिक त्रिमूर्ती मंगल कार्यालयात स्व. पारसमल चोरडिया फाउंडेशन यांच्या विद्यमाने कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्रामतर्फे मोफत नेत्र चिकित्सा, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
वणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायित्त्वातून हे शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिरात रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले जाणार असून, यासोबतच नेत्ररूग्णांवर सेवाग्राम येथे मोतिबिंदू शस्त्रक्रिया केले जातील. त्यानंतर रुग्णांना चष्मे सुद्धा वाटप करण्यात येणार असल्याचे आयोजकडाकडून सांगण्यात येत आहे.
आज मार्डी येथे आरोग्य शिबिर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 04, 2024
Rating: