सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यामध्ये शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक पुरुषोत्तम बुटे यांची मारेगाव तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे श्रेय ते विद्यमान आमदार संजयभाऊ देरकर यांना देत असून गेल्या तीस वर्षांपासून बुटे हे शिवसेना पक्षात इमाने इतबारे काम करतहेत. पक्षात किती आले आणि गेले. मात्र त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही, ते आजही कायम सोबत राहून पक्षासाठी निष्ठेने प्रामाणिकपणे काम करत आहे. त्याचीच फलश्रुती म्हणून त्यांना मारेगाव तालुक्याची धुरा देण्यात आली आहे असं बोलल्या जातं.
या निवडीबाबत त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे. तालुका प्रमुख श्री पुरुषोत्तम बुटे यांनी सर्व नवनिर्वाचित शिवसेनेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व तसेच मित्र परिवारांचे आभार मानले.
![]() |
पुरुषोत्तम बुटे यांचे मारेगाव तालुका प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करताना आ. संजय देरकर व पदाधिकारी |