सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : इंडियन मेडिकल असोसिएशन वणी व सुपर्ब हायजेनिक डिस्पोजल प्रायव्हेट लिमिटेड चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 21 जून 2025 रोजी लोढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वणी येथे विविध रुग्णालयातील आरोग्य सेवक व सेविका यांचे करिता बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर एक विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत श्री.निशांत सोनटक्के व श्रीमती विथीका वैद्य यांनी बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर सर्वांना ईत्यंभुत माहिती दिली. तसेच उत्स्फूर्तपणे सर्वांना मार्गदर्शन दिले. या कार्यशाळेला आयएमएचे पदाधिकारी तसेच होमिओपॅथी असोसिएशन व आयुर्वेदिक असोसिएशन यांचे सर्व डॉक्टर मंडळी उपस्थित होते. आयोजित या कार्यशाळेला जवळपास 80 ते 90 स्टाफ नर्सेस हॉस्पिटल कर्मचारी व डॉक्टर्स प्रामुख्याने उपस्थित होते.सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार आयोजकांच्या वतीने माणण्यात आले.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन वणीचे डॉ. शिरीष कुमारभार, डॉ. सुनील जुमनाके, डॉ.संकेत अलोणे, डॉ. स्वप्नील गोहोकार यांसह असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.