टॉप बातम्या

कासारबेहळ-सेवानगर शेतशिवारात अस्वलाचा धुमाकूळ

सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के 

महागाव : महागाव तालुक्यातील कासारबेहळ व सेवानगर परिसरातील शेतशिवारात अस्वलाचा वावर आढळून आल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठवड्यापासून या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, १ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास परिसरातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अस्वल दिसून आल्याने या चर्चेला पुष्टी मिळाली आहे.

शेतशिवारात अस्वल दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी, शेतमजूर तसेच महिला वर्गाला शेतात ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे वन्यप्राण्याच्या वावरामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

परिसरात अस्वलाचा वावर असल्याने शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, अशी परिस्थिती निर्माण झाली असून, वन विभागाने या घटनेची तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे. शेतशिवारात वावर असलेल्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकरी व शेतमजुरांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कासारबेहळ व सेवानगर परिसरातील शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

वन विभागाने तातडीने पथक पाठवून परिसराची पाहणी करावी, वन्यप्राण्याच्या हालचालींचा मागोवा घ्यावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();