टॉप बातम्या

मालती अपार्टमेंमध्ये ईडीची छापेमारी; सात तासांहून अधिक काळ तपास, वणीत खळबळ

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे

वणी : शहराच्या मुख्य वस्तीत असलेल्या ‘निळकंठ मालती अपार्टमेंट’ येथे गुरुवारी भल्या पहाटे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने अचानक शोधमोहीम राबविल्याने शहरात खळबळ उडाली. औषध व्यावसायिक रवी येरणे यांच्या सदनिकेत ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी सहाच्या सुमारास प्रवेश करून विविध कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे अधिकारी दोन इनोव्हा वाहनांमधून अपार्टमेंटमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी थेट येरणे यांच्या निवासस्थानी जाऊन कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदी तसेच इतर साहित्याची सखोल छाननी सुरू केली.

पहाटे सुरू झालेली ही शोधमोहीम सात तासांहून अधिक काळ सुरू होती. दुपारपर्यंत अधिकाऱ्यांकडून घरातील विविध कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे दिसून आले.

दरम्यान, ही कारवाई नेमक्या कोणत्या प्रकरणाच्या अनुषंगाने करण्यात आली, तसेच तपासादरम्यान ईडीच्या हाती काय लागले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ईडीकडून अधिकृत निवेदन मिळाल्यानंतरच या कारवाईमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पहाटेच्या सुमारास केंद्रीय तपास यंत्रणेचे पथक शहरातील प्रतिष्ठित अपार्टमेंटमध्ये दाखल झाल्याने परिसरात नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. कारवाईच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध चर्चांना उधाण आले असले, तरी अधिकृत तपशील समोर येईपर्यंत या चर्चांवर भाष्य करणे घाईचे ठरणार आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();