सगणापूर शाळेत नवागतांचे स्वागत...

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : 23 जून रोजी शाळेचा पहिला दिवस असल्याने सर्वत्र विद्यार्थ्यांचे स्वागत होत असताना सगणापूर (ता. मारेगाव) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत नवागतांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके, खाऊंचे वाटप करण्यात आले.दि. 23 जून 2025 ला सर्व शाळेतील विद्यार्थी यांचा शाळेचा प्रारंभ दिन चैतन्यमय आणि उत्साह वर्धक तयार होण्यासाठी नव्याने प्रवेशित होणा-या विद्यार्थ्यांना डॉ मनिष मस्की यांचे हस्ते पाठयपुस्तके वितरित करण्यात आले. 

यावेळी डॉ.मनीष तुळशीराम मस्की, शाळेचे मुख्याध्यापक गौरव चिकाटे, अनिल मडावी सर, सुजाता मेश्राम मॅडम,सौ. नेहा मनीष मस्की, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक संतोष भाऊ मते, चि.भार्गव मनीष मस्की आणि शाळेतील विद्यार्थी व सर्व पालक उपस्थित होते.

शाळा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम अतिशय छान उपक्रम
शाळेचा पहिला दिवस हा आनंददायी असतो. शाळेचे असे आनंददायी वातावरण पाहुण त्यावेळेच्या आठवणी जागी झाल्या, शाळा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम अतिशय छान उपक्रम आहे.सगणापूर शाळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि मला त्यामध्ये सहभागी होता आले याच मला आनंद वाटतो, असं "सह्याद्री चौफेर"शी बोलताना डॉ. मनीष मस्की म्हणाले.