टॉप बातम्या

खादी-कॉटनच्या खरेदीला वणीत ग्राहकांचा प्रतिसाद; चार कपड्यांचा आकर्षक कॉम्बो


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात सुरू असलेल्या ‘जय महाराष्ट्र खादी कॉटन महासेल’ला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन वर्षांपासून वणीत आयोजित होणाऱ्या या महासेलमध्ये खादी व कॉटनच्या शर्टसह महिलांसाठी कुर्ती उपलब्ध आहेत.

यवतमाळ रोडवरील जैताई मंदिरामध्ये सुरू असलेल्या या महासेलचे विशेष आकर्षण म्हणजे फक्त १ हजार रुपयांत चार शर्ट किंवा कुर्ती असा उपलब्ध असलेला कॉम्बो. दर्जेदार कपडे किफायतशीर दरात मिळत असल्याने वणीसह परिसरातील ग्राहक खरेदीसाठी येथे गर्दी करत आहेत.

सणासुदीच्या खरेदीसाठी कुटुंबातील सर्वांसाठी विविध पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने ग्राहकांकडून या महासेलला पसंती मिळत आहे. खादी-कॉटनच्या कपड्यांची आवड असणाऱ्यांसाठी किफायतशीर दरातील ही खरेदीची संधी ठरत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();