सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : आत्महत्येच्या मालिका सुरुच आहे. एका तरुण विवाहिताने गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना आज गुरुवारला सकाळी नऊ वा. सुमारास उघडकीस आली.
मारोती अंबादास आत्राम (32) रा. वार्ड नं 2 (मारेगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहित युवकाचे नाव आहे. मृतक हा एका किराणा दुकानात कामाला होता, मारोती याने येथील रात्रीच्या वेळी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा कयास असून आज सकाळी 9 च्या सुमारास मृतदेह निंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
मारोतीने नेमकी कशामुळे आत्महत्या केली याचे कारण अस्पस्ट आहे. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत. परिणामी, तालुक्यात वाढत्या आत्महत्येचा रेशो कायम असून या मालिकाने तालुका कमालीचा प्रभावित होत आहे. घटनेचा पुढील तपास बिट जमादार करीत आहे.
तरुण विवाहितची गळफास घेऊन आत्महत्या,मारेगाव येथील घटना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 05, 2024
Rating: