सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव हा आदिवासीबहुल तालुका असून या तालुक्यातील नागरिकांचा मुख्यत: व्यवसाय शेती आहे. तरीही सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र नसल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी लोकांकडे कापूस पडत्या भावात कापूस विकावा लागत आहे. त्याबाबतचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार मारेगावचे संचालक रमण डोये, अविनाश लांबट, ता. सरचिटणीस प्रशांत नांदे माजी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांना दिले. ही बाब गांभीर्याने घेत बोदकुरवार यांनी यासंदर्भात देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांना तातडीने सीसीआयचे प्रमुख ललितकुमार गुप्ता यांना बोलून मारेगाव येथे सीसीआय केंद्र सुरू करण्यास सांगितले. कापूस विक्रीसाठी तहसीलमधील शेतकऱ्यांनी गडबडीत आणू नये, लवकरच सीसीआय केंद्र सुरू करण्यात येणार आहे असे आश्वासन दिले.
मारेगावात सीसीआय कापूस खरेदी सुरू होणार आहे- माजी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 04, 2024
Rating: