सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर आणि कोयाराणी प्रोडक्शन चंद्रपूर यांचे द्वारे कोयराजाल अँड कोयराणी नॅशनल लेवल ट्रायबल कल्चर मॉडलिंग कॉम्पिटिशन शो २०२४ ला चंद्रपूर येथे इम्पेरियल पॅलेस येथे दि. १ डिसेंबरला घेण्यात आला होता.
या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून कॉम्पिटिशन साठी आदिवासी मुले-मुली आली होती. यामध्ये यवतमाळ येथील लेखापरीक्षक नरेश उईके यांची मुलगी कु. कशिश निकिता नरेश उईके हिचा महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उडीसा, तामीलनाडु, आंध्रप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, राज्याची नॅशनल लेवल मध्ये प्रथम क्रमांक विनर पटकवला आहे.
जिल्ह्यात सगळीकडे तिचे कौतुक होत आहे. कशिश ला लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे. काही गोंडी अल्बम सुद्धा गोंडी गायक गोंडी गायक सुरेश वेलादे व सुबोध वाळके यांनी तयार केलेली आहे.
आई वडील यांनी तिच्या कलेची जाण ओळखून प्रत्येक स्पर्धेमध्ये तिला सहभागी होण्यासाठी घेऊन जात असतात. कशिशचे अभिनंदन आदिवासी समाजातील संघटनेकडून केले जात आहे.
कुमारी कशिश उईके महाराष्ट्रातुन प्रथम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 04, 2024
Rating: