सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील चिंचमंडळ गावाच्या प्रवेशद्वाराच्या समोर भरधाव दुचाकीने समोरासमोर धडक दिली. रामदास गणपत पचारे (वय 55) रा.चिंचमंडळ ह्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले असता सेवाग्राम येथे पोहचताच त्याचे निधन झाले. वृत्तलिहेपर्यंत घटनेची तक्रार झाली नव्हती. ही घटना सकाळी 7.50 वा. दरम्यान, घडली. रामदास यांच्या पाठीमागे पत्नी वं चार विवाहित मुली असा परिवार आहेत. मृतक रामदास पचारे हे सामाजिक कार्यकर्ते अतुल पचारे यांचे चुलत काका होते.
वणी उपविभागात अपघात वाढले
सोमवारी रात्री वणी ते नांदेपेरा रोड वर दुचाकी व कार एकमेकांसमोर धडकले. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. आनंद विजय नक्षीणे (अंदाजे वय 27) रा. वांजरी (मजरा) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघाताची माहिती वांजरीत पसरताच मित्र मंडळीनी अपघातस्थळ गाठले. त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय वणी येथे शवविच्छेदनाकरिता आणण्यात आला. दरम्यान, पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचली. उशिरापर्यंत या प्रकरणात प्राणांतिक अपघाताची नोंद झालेली नव्हती.
दुचाकीच्या धडकेत 55 वर्षीय तरुण ठार,चिंचमंडळ गावाजवळील घटना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 03, 2024
Rating: