सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : हळदीचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने नातेवाईकांकडे जात असताना अज्ञात वाहणाच्या धडकेत मारेगाव स्थित मोहित उर्फ ओम बंडू उज्वलकर (23) यांचे नागपूर येथे गुरुवारी दुःखद निधन झाले.
शहरातील वार्ड नं 7 मधील उज्वलकरांचा एकुलता एक कुटुंबाचा आधारवाड असलेला मोहित उर्फ ओम हा चहा चा व्यवसाय करून उदरनिर्वाह करायचा. अशातच मावस बहिणीच्या लग्नाला नागपूर येथे गेलेल्या हळदी चा कार्यक्रम आटोपून आराम करण्यासाठी जात असताना अज्ञात वाहणाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत खाली पडून डोक्याला गंभीर इजा झाली, यात तो जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारला मध्यरात्री संत्रानगरी उपराजधानीत घडली.
त्याच्या पाठीमागे वडील, आई व लहान बहीण असा परिवार आहे.
कुटुंबाचा आधारवड मोहित उज्वलकर यांचे नागपूर येथे अपघाती निधन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 05, 2024
Rating: