सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तालुक्यातील निलजई येथील जी. एन. आर. कंपनी प्रा.लि मध्ये रोजगारासाठी स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्यावा, अशा आशयचे निवेदन बुधवारी (ता.4) सब एरिया मनेजर वेस्टर्न कोल्ड फिल्ड लिमिटेड, निलजई यांना देण्यात आले.
भूमिपुत्रांना डावलून परराज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. असा आरोपी देखील निवेदनातून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी येथील स्थानिक भूमिपुत्रांचा प्रथम अधिकार आणि हक्क आहे. असे असताना त्यांना सदर कंपनी रोजगारापासून वंचित ठेवत आहे. हा अन्याय मनसे सहन करणार नाहीत, तातडीने लक्ष घालून स्थानिक युवकांना रोजगार देण्याची ताकीद कंपनीला द्यावी, व युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. असे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कंपनीच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारेल, या दरम्यान होणाऱ्या परिणामास स्वतः जबाबदार राहाल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात निवेदन देताना स्थानिक भूमिपुत्र सह मनसैनिक उपस्थित होते.
स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्या - मनसेचे निवेदन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 05, 2024
Rating: