वणी उपविभागात देवेंद्र 3.0 पर्वाचा जल्लोष

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. यानिमित्ताने वणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नगरपरिषदेच्या रस्त्यावर थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपचे माजी आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. शपथविधी सोहळा सुरू होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि लाडू वाटप करत आनंदोत्सव साजरा केला.

मुंबई येथील आजाद मैदानावर हा महाशपथविधी सोहळा पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
वणीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपच्या वतीने मोठ्या स्क्रीनवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. या ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. शपथविधी सुरू होताच जल्लोष साजरा करण्यात आला. या सोहळ्याला भाजप पदाधिकाऱ्यासह सामान्य नागरिकांचीही दरम्यान लक्षणीय उपस्थिती होती.

देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा अनुभवी नेता महाराष्ट्राला पुन्हा मुख्यमंत्री म्हणून मिळाला आहे, ही संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या नवीन उंचीवर जाईल,मीही सदैव तत्पर आहे,वणी विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलणार - माजी आमदार, संजीवरेड्डी बोदकुरवार 

मारेगावात भाजप महायुतीचा आनंदोत्सव....

देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ यांचा 3.0 पर्वाचा जल्लोष वणी,झरी सह मारेगावात सुद्धा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतशबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान मिठाई वाटण्यात आली. 

शपथविधीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले होते. तालुक्यातील सर्व पदाधिकारी मारेगावात दाखल झाली. तिकडे देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे ह्यांनी शपथ घेतली आणि इकडे फटाक्यांची आतिशबाजी सुरु झाली. गाजत वाजत सर्वांनी टाळ्यांच्या गजरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं स्वागत केलं. भाजप तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी जनतेला या प्रसंगी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना तालुका अध्यक्ष विशाल किन्हेकर, सरचिटणीस प्रशांत नांदे, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, शंकर लालसरे, नगरसेवक अनूप महाकुलकर, वैभव पवार, राहुल राठोड, सुनील देऊळकर, पवन ढवस, प्रविण बोथले, प्रसाद ढवस, कोहळे सर, लीलाधर काळे, शोभाताई नक्षणे, दादाराव ढोबरे, चंद्रकांत धोबे, प्रशांत भंडारी, मारोती पाचभाई, विजय मेश्राम, मारोती राजूरकर, दत्तू लाडसे, जगदीश ठेंगणे, पंकज खिरटकर, विठ्ठल दानव, अजेय वासेकर, प्रशांत जुमडे,गणपत वऱ्हाटे, विश्वजित गारगाटे, स्वप्नील कडू, आदींची उपस्थिती होती.
वणी उपविभागात देवेंद्र 3.0 पर्वाचा जल्लोष वणी उपविभागात देवेंद्र 3.0 पर्वाचा जल्लोष Reviewed by सह्याद्री चौफेर on December 05, 2024 Rating: 5
Powered by Blogger.